राष्ट्रवादीचा विधानसभेचा उमेदवार भाजपच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीचा विधानसभेचा उमेदवार भाजपच्या वाटेवर ?

मुंबई – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे. परंत त्यापूर्वीच विधानसभेची चर्चा सुरु झाली आहे. काही नेत्यांना उमेदवारीचे डोहाळे लागले असल्याचं दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार राहिलेल्या नमिता मुंदडा या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली
आहे. त्याचं कारण म्हणजे सुरेश धस यांच्या मुलाच्या लग्न समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.नमिता मुंदडा ह्या नंदकिशोर मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. यावेळी नमिता मुंदडा यांना सेल्फीचा आनंद न मावल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सेल्फी घेतल्याने त्या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय नवर्दुळात रंगली आहे.

दरम्यान मागील केज विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नमिता यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपाच्या संगीता ठोंबरे विरुद्ध नमिता मुंदडा अशी थेट लढत झाली होती. मागील एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेलं मतभेद उफाळून आले होते. यात नंदकिशोर मुंदडा यांनी एकाकी भूमिका घेतल्याने बजरंग सोनवणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर जोमाने प्रचाराला लागल्याचे सर्वांना माहीत आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंदकिशोर मुंदडा आणि पृथ्वीराज साठे असे दोन गट आहेत.लोकसभेला दोन्ही गटांनी आपापल्या परीने प्रचार केला. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र मुंदडा गट हा भाजपच्या कळपात सामील होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS