विखेंच्या राजीनाम्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया !

विखेंच्या राजीनाम्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया !

मुंबई -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पक्षाने सर्वकाही दिल्यानंतरही पक्ष सोडणारे काही नेते आमदार फोडून पक्ष तोडण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची मनोवृत्ती दर्शविते, 134 वर्षांची काँग्रेस पराभवाने संपणार नाही. पुन्हा नव्या उर्जेने, ताकदीने उभारी घेईल. गद्दारी केली तरी त्यांना शुभेच्छा. शेवटी काँग्रेस महात्मा गांधींची आहे. असं सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विखेंसोबत काँग्रेसचे आठ ते दहा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकर भाजपाच्या संपर्कात आहेत. तसेच विखे यांच्याबरोबर अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार, भारत भालके, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे,आमदार गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांनीही विखेंची भेट घेतल्याने तेही भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

परंतु मागील आठवड्यात विखे पाटील यांची भेट घेणार्‍या आमदार राहुल बोंद्रे यांनी आपण भाजपात जाणार नाही, तसेच विखेंनी भाजपात जाऊ नये, काँग्रेसमध्येच रहावे अशी विनंती करण्यासाठी आपण त्यांना भेटलो होतो असं म्हटलं आहे.त्यामुळे राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS