मुंबईतील काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा!

मुंबईतील काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा!

मुंबई – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या पदाचा राजीनामा सोपवतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही मांडला असल्याची माहिती आहे.

दरम्यान महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. तसेच देवरा काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS