सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सातारा येथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आज ते सोलापूर येथील इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेत आहेत. या मुलाखतीला सोलापुरातील दोन विद्यमान आमदारांनी अनुपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान आजच्या मुलाखतीकडे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे,आमदार दिलीप सोपल आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी पाठ फिरवली आहे. बबनराव शिंदे भाजपमध्ये तर दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि सोपल हे दोघे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत मात्र पवार सोलापुरात असताना उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS