अहमदनगर – शिर्डी अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या भाजपा प्रवेशाच्या हालचालींना सुरुवात झाली असून अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे या पदाधिकाय्रांनी राजीनामे पाठविले असून माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि आमदार वैभवराव पिचड हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा आशयाची भावना राष्ट्रवादी काँगेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान आमदार पिचड यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेटीवेळी नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अकोलेतील हालचाली पाहता आमदार पिचड हे भाजपमध्ये जाणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS