काँग्रेसला आणखी एक धक्का, ‘या’ आमदाराचा राजीनामा!

काँग्रेसला आणखी एक धक्का, ‘या’ आमदाराचा राजीनामा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला असून माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी राजीनामा दिला आहे. गोरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे भाजपला मदत केली होती. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीला धक्का बसला असुन राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनीही पक्ष सोडणार असल्याची कबुली दिली आहे. जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक खेतली. या बैठकीत आपण दोन दिवसात पक्षांतर करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.येतील त्यांना सोबत घेऊ,जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल नाराजी नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आहे.

COMMENTS