राज्यात लाखो क्विंटल तूर खरेदी विना पडून, आज तूर खरेदीचा शेवटचा दिवस

राज्यात लाखो क्विंटल तूर खरेदी विना पडून, आज तूर खरेदीचा शेवटचा दिवस

मुंबई –  शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, असे पोकळ आश्‍वासन देणारे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचे दिसत आहे. कारण नाफेडकडून होणाऱ्या तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे, तरीही लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. त्यामुळे 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुक्काम ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभ असल्याचे दिसत आहे.

 

वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी नाफेड्‌ची तूर खरेदी अद्यापही सुरु नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी या आर्थिक विंवचनेत सापडला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तूर खरेदी सुरू आहे. मात्र यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी तूर खरेदी होईल, या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी पायपीट मात्र थांबली नसल्याचेही दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 28 फेब्रुवारीपासून कित्येक क्विंटल तूर अकोला बाजार समितीच्या यार्डात खरेदीविना तशीच पडून आहे. काल संध्याकाळपर्यंत अकोला जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर 2084 गाड्या तूर खेदीची प्रतिक्षा करत उभ्या आहेत. जर शेतकऱ्यांकडील तुरीची शंभर टक्के खरेदी करायची असेल तर आणखी 12 दिवस खरेदी सुरू ठेवावी लागेल. त्यामुळे गरज पडली तर सरकार तूर खरेदीसाटी मुदत वाढवणार असल्याचे आश्‍वासन देणारे सरकार नेमके कोणते पाऊल उचलणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे दिसत आहे.

COMMENTS