नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरातून सरकारचा निषेध केला जात आहे. या आंदोलनाचं लोन आता झारखंडमध्ये पोहचलं असून शरद पवार यांच्या समर्थनार्थ झारखंड येथील तमाड मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा व राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक व महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदेलकांनी यावेळी सरकारचा निषेध केला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सरकारने हे आरोप राजकीय सुड बुद्धीतून केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
तसेच या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली होती. तसेच त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. अण्णांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली होती. या प्रकरणात शरद पवारा यांचं नाव आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता खुद्द अण्णा हजारे यांनीच या प्रकरणी एक मोठा खुलासा केलाय. मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव कुठेही नाही. ईडीने कारवाई का केली ते आता काही दिवसांनी पुढे येईल असं अण्णांनी म्हटलं आहे.
शरद पवार उद्या ईडीच्या कार्यालयात जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण उद्या दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. “काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे”. तसेच “सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,” असं ट्वीट पवारांनी केलं आहे.
काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.@MumbaiPolice @NCPspeaks
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2019
COMMENTS