बंडखोरीमुळे महायुतीला ‘या’ जागांवर बसू शकतो फटका ?

बंडखोरीमुळे महायुतीला ‘या’ जागांवर बसू शकतो फटका ?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक युतीसाठी सोपी असल्याची चर्चा होती. परंतु जसजशी निवडणूक जवळ आली. तसतसं शिवसेना-भाजपला बंडखोरीचं गृहण लागलं असल्याचं पहावयास मिळाले आहे. पक्षामध्ये आलेल्या अनेक नवीन नेत्यांना शिवसेना-भाजपनं उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश केला तर काही नेते अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

या बंडखोरीमुळे युतीला धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काहींची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आलं आहे. परंतु तरीही काही जागांवर बंडखोरांचं मन वळविण्यात शिवसेना-भाजपला अपयश आलं आहे. त्यामुळे या जागांवर युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात महायुतीतील नेत्यांची बंडखोरी

1) राजू तोडसाम – भाजप – आर्णी

2)संतोष ढवळे – शिवसेना – यवतमाळ

3) सीमा सावळे – भाजप – दर्यापूर

4) अमोल शिंदे – भाजप – पाचोरा

5) संतोष ढवळे – शिवसेना – यवतमाळ

6) संजय देशमुख – भाजप – दिग्रस

7) राजू बकाणे – भाजप – वर्धा

8) डॉ. मधू मानवतकर – भाजप – भुसावळ

8) अनिल चौधरी – भाजप – रावेर

9) अतुल देशमुख – भाजप – खेड आळंदी

10) राहुल कलाटे – शिवसेना – चिंचवड

11) विशाल धनावडे – शिवसेना – कसबा

12) नारायण पाटील – शिवसेना – करमाळा

13) महेश कोठे – शिवसेना – सोलापूर मध्य

14) मनोज घोरपडे – भाजप – कराड उत्तर

15) आशिष जैस्वाल – शिवसेना – रामटेक

16) चरण वाघमारे – भाजप – तुमसर

17) निशिकांत पाटील – भाजप – इस्लामपूर

18) सम्राट महाडिक – भाजप – शिराळा

19) डॉ. रवींद्र आरळी – भाजप – जत

20) राजुल पटेल – शिवसेना – वर्सोवा

21) तृप्ती सावंत – शिवसेना – वांद्र पूर्व

22) मुरजी पटेल – भाजप – अंधेरी पूर्व

23) विनोद अग्रॅवाल – भाजप – गोंदिया

24) संतोष जनाटे – भाजप – बोईसर

25) नरेंद्र पवार – भाजप – कल्याण पश्चिम

26) धनंजय बोडारे – शिवसेना – कल्याण पूर्व

27) राजन तेली – भाजप – सावंतवाडी

28) रणजीत देसाई – भाजप-स्वाभिमान पुरस्कृत – कुडाळ

COMMENTS