मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश करणारा माजी आमदार आता शिवसेनेत दाखल झाला आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी यावेळची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीतून लढवली होती. परंतु सानप यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान बाळासाहेब सानप 2014 मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. मात्र विद्यमान आमदार असूनही सानप यांना भाजपने यावेळी तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी मनसेमधून आलेल्या राहुल ढिकले यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन ही निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत राहुल ढिकलेंनी सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकत सानप यांनी सत्तेत सहभागी होणाऱ्या शिवसेनेची वाट धरली आहे.
COMMENTS