मुंबई – आरे कारशेडबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली असून पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! #SaveMetroSaveMumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
तसेच जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील असही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते.
अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील. #SaveMetroSaveMumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
COMMENTS