मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमधील बैठक संपली, या विषयावर झाली चर्चा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमधील बैठक संपली, या विषयावर झाली चर्चा!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज बैठक पार पडली. या दोन्ही नेतियांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार करायचा की नाही यावर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. परंतु यावर कोणता निर्णय घेण्यात आला हे अजून जाहीर करण्यात आलं नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काँग्रेसच्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. काँगेसची यादी आज अंतिम झाली नाही तर विस्तार करायचा की नाही याव चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्याचा शपथविधी लांबण्याची शक्यता देखील आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारनंतर विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार. यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ही १३ मंत्री शपथ घेणार असून यातही १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री असणार आहेत. काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे.

COMMENTS