मुस्लिम समाजाने तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप देऊ नये. मुस्लिम समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. त्यासाठी मुस्लिम समाजातील जाणत्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. जेणेकरून आपण मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि त्यामधून मार्ग काढू शकतो.
मुस्लिम स्त्रियांनाही त्यांचे मत मांडण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजातील जाणत्या लोकांनी महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) बसवजयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या तिहेरी तलाकच्या प्रथेसंदर्भात भाष्य केले. तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे त्यांनी म्हटले.
COMMENTS