महावितरण भरती प्रक्रिया स्थगित

महावितरण भरती प्रक्रिया स्थगित

कोल्हापूर : मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकरभरती सुरु झाल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. महावितरणकडून दोन दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. तरीही प्रक्रिया सुरु राहिली तर आंदोलन हिंसक होईल असा इशाराही देण्यात आला. कोल्हापुरात महावितरण कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली.

राज्यभरात महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदांकरता दोन हजार उमेदवार भरायचे होते. त्यासाठी जुलै 2019 मधे ऊर्जा विभागाकडून जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात आली. पंरतु दरम्यानच्या काळात सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे उर्जा विभागाने मराठा समाजातील उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करायचे ठरवलं. परंतु हा अन्याय असल्याचा आरोप करत महावितरणची भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि दोन दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. तरीही प्रक्रिया सुरु राहिली तर आंदोलन हिंसक होईल असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापुरात महावितरण कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. आज सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हे सगळे आंदोलक कार्यालयात घुसले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकारी यांच्यावर फाईल आणि डायरी फेकल्याने वातावरण काही प्रमाणात तणावाचे बनले. त्यानंतर काही वेळातच विभागीय अधिकाऱ्यांशी फोनवरुन बोलणं झाल्यानंतर इथली भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. आंदोलकांनी याचं लेखी पत्र महावितरणच्या कार्यालयाकडून घेतले

COMMENTS