मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुपर न्यूमररीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. उद्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार आहेत. राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीनंतर ही माहिती दिली. वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते. तसेच खासदार संभाजीराजे यांच्या शिष्टमंडळात अॅडव्हॉकेट महादेव तांबे, अॅडव्हॉकेट पिंगळे, राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, राजन घाग, राजेंद्र दाते-पाटील, संजीव भोर, प्राध्यापक निमसे उपस्थित होते.
SECB ला धक्का लागू नये यासाठी कायदेशीर बाबी तपासून उद्याच याविषयी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार आहेत. लवकरच निर्णय होईल. सुपरन्यूमररीविषयी सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. सुपर न्युमररी पद्धतीने जागा कशा वाढवायच्या यावर अधिक चर्चा झाली. यावर सरकार सकारात्मक आहे. लवकरच युद्धपातळीवर बैठक होणार आहे. उद्याच राज्य सरकार वकिलांशी चर्चा करणार आहेत, असे संभाजीराजे यांनी माहिती दिली.
COMMENTS