मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील गाव-खेड्यात राजकारण तापलं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी राज्यभर फिरायला हवं. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो तरच आपली ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो’, असे पाटील म्हणाले.
राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत मनसेने या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशच राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना राज्यभर फिरण्याचा सल्ला दिला आहे. पक्ष संघटन मजबूत करायचं असेल आणि पक्ष वाढवायचा असेल तर तुम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरावं लागतं. फिरल्याने, लोकांशी संवाद साधल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढल्याने आपल्याला नेमका किती जनाधार आहे, जनतेचा किती प्रतिसाद आहे, याचा अंदाज येतो, असे पाटील पुढे म्हणाले.
COMMENTS