मुंबई – केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात महिनाभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरातील सर्व शेतकरी संघटना व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बळीराजाप्रती हवी कृतज्ञतेची जाण असे ट्विट करून केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो”, असे ट्विट करत शरद पवार यांनी टीका केली.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळासह राष्ट्रपतींची भेट घेऊन देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्याबाबत लवकरच निर्णय घेऊन तोडगा काढवा, अशी मागणी होती.
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. pic.twitter.com/3CWWLuHrdV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 23, 2020
COMMENTS