मुंबई – “हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल भाजपचे आशिष शेलार यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात सहभागी झालेल्या मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने फ्री काश्मीर (काश्मीर मुक्त करा) पोस्टर झळकावलं होतं. त्यावरून बराच वाद झाला. त्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला असून, भाजपाने त्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत. “कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला. कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या “हातात” मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,” असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.
कसाबचा पाहुणचार बिर्याणीने
केला, कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो..
त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट?
आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार?
हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2020
COMMENTS