राज्यातून भाजपने दोन ओबीसी, एक एसटी आणि एक मराठा प्रतिनिधीला संधी दिली आहे. काय आहेत यामागली कारणे ?
नारायण राणेंच्या समावेशामागील कारणे
आक्रमक मराठा चेहरा, उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक, रिझल्ट ओरिएनंटेड नेते म्हणून राणेंची ख्याती
पुढील 8 महिन्यात मुंबईसह, ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर या महापालिकांची निवडणूक आहे. या सर्व ठिकाणी शिवेनेचा वरचष्मा आहे. तसंच कोकणातही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या सर्व ठिकाणी राणेंचा पक्षाला फायदा होऊ शकतो.
कपील पाटील यांच्या निवडीमागील कारणे
ओबीसी चेहरा, आगरी समाजाचे नेते, एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे. सध्या हा समाज ब-यापैकी शिवेसनेसोबत आहे. पुढील 8 महिन्यात होणा-या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कपील पाटील यांना संधी दिली गेली असण्याची शक्यता आहे.
भारती पवार यांच्या निवडीमागील कारणे
आदिवासी आणि उच्चशिक्षीत चेहरा
राज्यातील आदिवासी तसंच उत्तर महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमएधील आदिवासी पट्ट्यातही भाजपला फायदा होऊ शकतो. डॉ. हिना गावित यांना पक्षातूनच विरोध झाल्याची दबक्या आवाजात चर्चा, त्यामुळे भारती पवारांना संधी मिळण्याची शक्यता
डॉ. भागवत कराड यांच्या निवडीमागील कारणे
ओबीसी चेहरा, गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर पहिल्यांदाच वंजारी समाजाला केंद्रात संधी
पंकजा मुंडे यांना शह म्हणूनही भागवत कराड यांच्या मंत्रिमंडळ समावेशाकडं पाहिलं जातंय
COMMENTS