भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ पुन्हा एकदा घसरली. त्यांनी थेट शेतक-यांना साल्यांनो एवढी तूर खरेदी करुनही रडता कसे रे ? या भाषेत शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळलंय… दानवेसाहेब एवढी तूर खरेदी केली आणि तेवढी तूर खरेदी केली हे काय सांगता. तूर खरेदी केली म्हणजे तुम्ही, तुमचे सरकार, देवेद्र फडणवीस, नरेंद्र मोदी शेतक-यांवर उपकार करतायेत का ? कास्तकराशी पंगा घेऊ नका. तूर खरेदीत तुम्ही काय दिवे लावलेत हे शेतक-याला चांगले माहिती आहे. तूर खेरदी केल्याचं तुणतुण वाजवू नका. गेल्या वर्षी आमची तूर 10 हजार रुपये प्रति क्विंटलन विकली होती. यावेळी ती 5 हजार आणि आतातर 4 हजार रुपये क्विंटलनं विकावी लागत आहे. प्रत्येक क्विंटलमागे 6 हजार रुपयांचा फरक तुमच्या सरकारने शेतक-याला द्यायला पाहिजे.
एकीकडे तूर उत्पादकाची ही अवस्था असताना कधी नव्हे तो द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडलाय. त्याची द्राक्षे 10 रुपये आणि 20 रुपये किलोनं विकावी लागत आहेत. तीच परिस्थिती डाळिंब उत्पादकांची आणि कांदा उत्पादकांची झालीय. शेतक-यावर आस्मानी संकटं तर वारंवार येतातच पण तुमच्या राज्यात सुलतानी संकटांनी शेतकरी जेरीस आलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नालायकपणामुळं तुम्हाला याच कास्तकरानं भरभरुन मतं दिली आहेत. हे विसरु नका. पण सध्या त्याची आगीतून उटून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झालीय. ज्या वेगानं तुम्हाला विजयी केलं त्याच्या दुप्पट वेगानं तुम्हाला खाली आणायला हा कास्तकार कमी करणार नाही. त्यामुळं जरा जपून बोला……. आणि झालेल्या प्रकरणी शेतक-यांची बिनशर्त माफी मागा…. तुम्हाला चढलेली सत्तेची नशी उतरवायला कास्तकाराला फार वेळ लागणार नाही.
COMMENTS