रजनिकांत नवा राजकीय पक्ष काढणार ?

रजनिकांत नवा राजकीय पक्ष काढणार ?

दक्षिणेतला सुपरस्टार रणनिकांतनं काल चेन्नईमध्ये चाहत्यांशी संवाद साधला. तब्बल 9 वर्षानंतर तो चाहत्यांशी सार्वजनिकरित्या भेटला. यावेळी बोलताना त्यानं राजकारणावरही भाष्य केलं. मी भविष्यात राजकीय पक्ष काढला तर चुकीच्या लोकांना अजिबात जवळ करणार नाही असं रजनिकांत म्हणाला. प्रस्थापीत राजकीय पक्षांना फक्त मत मिळवण्यासाठी मी हवा असतो अशी खंतही त्यानं बोलून दाखवली. त्यातच त्याने आपण तामिळनाडूचा राज्य दौरा करणारं असल्याचंही जाहीर केलं. राज्यातील 17 जिल्ह्यातील चाहत्यांशी तो संवाद साधणार आहे. त्यामुळे रजनिकांतच्या राजकीय पक्ष काढण्याचा चर्चेला उधाण आलं आहे. रजनिकांत राजकीय पक्ष काढणार अशा बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यानं राजकीय भाष्य केलं आणि राज्यव्यापी दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो आता राजकीय पक्ष काढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जयललितांच्या निधनामुळे तामिळनाडूमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. या सर्व घटकांचा विचार केला तर रजनी नवा पक्ष काढू शकतो असंही बोललं जातंय. रजनिकांतचा एक चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शीत होणार आहे. मग त्याच्या प्रमोशनसाठी तर हा दौरा नाही ना ?  अशीही चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे.  रजनीचा राज्य दौरा राजकीय पक्ष काढण्यासाठी की सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे कळण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावे लागेल.

COMMENTS