पंकजा मुंडे आणि दानवे यांचा अंगणवाडी घोटाळ्यात सहभाग –  आप

पंकजा मुंडे आणि दानवे यांचा अंगणवाडी घोटाळ्यात सहभाग – आप

‘पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी घोटाळा केला असून, या घोटाळ्यात दानवेही सहभागी आहेत. असा थेट आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीति शर्मा-मेनन यांनी केला आहे.  भाजपच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे यांच्यावर प्रीति शर्मा-मेनन यांनी आरोप केला असून याप्रकरणी पंकजा मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आप ने केली आहे.

अंगणवाडयांना नियमबाह्य पद्धतीने खाजगी ठेकेदारांकडून पोषण आहार पुरवण्यात येत असून, हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीति शर्मा-मेनन यांनी केला आहे.

‘बालविकास सेवा (आयसीडीएस) माध्यमातून सर्व अंगणवाडयांना पोषण आहाराचा पुरवठा ठेकेदारांकडून नव्हे. तर ग्रामीण समुदाय, स्वयंसहाय्य गट व महिला गटाकडून करण्यात यावा. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांनी नियमबाह्य पद्धतीने खाजगी ठेकेदारांना ही कामं दिली.’ असा आरोप प्रीति मेनन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

COMMENTS