आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या 1 जूनपासून संपावर गेलेला शेतक-यांसाठी ही आनंदाची बातमी असू शकते. कारण  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जमाफी संदर्भात आज बैठक घेतल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली आहे.

इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे. म्हणून यावर अभ्यास करण्यासाठी 4 महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे.”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तर “मागच्या काळात कर्जमाफीसाठी घोटाळा झाला आहे, तो होऊ नये म्हणून IT बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार आहोत.”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या प्रश्नावर खऱ्या शेतकऱ्यांशी, शेतकरी नेत्यांशी चर्चा करु, आमचे विरोधक असले तरी चर्चा करु, असेही ते म्हणाले.

COMMENTS