आता पेट्रोलचे दर रोज बदलणार, 16 जूनपासून अंमलबजावणी ?

आता पेट्रोलचे दर रोज बदलणार, 16 जूनपासून अंमलबजावणी ?

 

भारतीतील पेट्रोलचे दर दररोज बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 16 तारखेपासून होऊ शकते. पेट्रोलिएम मंत्रालातील सूत्रांच्या हवाल्याने ईटी नाऊ या या इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. देशातील तेल कंपन्या सध्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतात. त्यानुसार दरामध्ये चढ उतार होतो. मात्र या निर्णयामुळे तेल कंपन्याना तोटा होत असल्याचं त्यांचं म्हणंण आहे. पेट्रोल डिझेलच्या दराबाबत स्थापन करण्यात आलेल्या एका समितीने पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणयाची शिफारस केली आहे. असं केल्यामुळे ग्राहकांना एकदम दोन रुपये किंवा तीन रुपये दरवाढ केली असे वाटू नये तर दररोज थोडी थोडी दरवाढ केली तर त्यातून त्यांना दरवाढीची जाणीव होऊ नये असा यामागचा उद्देश असल्याचं बोललं जातंय. मात्र या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर रोज किती दर यावरुन ग्राहक आणि पेट्रोलपंप चालक यांच्यात वाद होऊ शकतात. तर राजकीयदृष्ट्याही हा निर्णय धोक्याचा असू शकतो. त्यामुळे मोदी सरकार यावर काय निर्णय घेते याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. डिझेलबाबत मात्र अजून असा निर्णय झाल्याची माहिती नाही.

COMMENTS