पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्व नगरसेवकांना ड्रेसकोड मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे महापालिकेच्या कर्मचा-यांना गणवेश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी 1 कोटी, 1 लाख 90 हजार 655 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी महालक्ष्मी ड्रेसेस यांच्याशी करारनामा करुन येणा-या खर्चावर स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.महिला अधिका-यांनादेखील ‘पोशाख’ दिला जाणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या क्लास वन अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर ‘नेमप्लेट’ असणार आहे.
महापालिकेच्या कर्मचा-यांना देण्यात येणा-या गणवेशाप्रमाणेच नगरसेवकांनाही ड्रेसकोड देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला अधिका-यांनादेखील ड्रेसकोड असणार आहे. त्याचबरोबर महापालिकेतील एक व दोन श्रेणीच्या अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर संबंधित अधिका-याची नेमप्लेट आणि महापालिकेचा सिंबॉल असणार आहे. या विषयावरही चर्चा करुन स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
COMMENTS