क्रिकेटर ते फार्मर, श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा रिटार्यरमेंट प्लॅन !

क्रिकेटर ते फार्मर, श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा रिटार्यरमेंट प्लॅन !

 

बातमीचं टायटल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना ! पण हे खरं आहे. श्रीलंकेसाठी क्रिकेटची मैदानं गाजवणारा, श्रीलंकेला अनेक विजय मिळवू देणारा आणि नुकतीच कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतलेला जगप्रसिद्ध क्रिकेटपूट कुमार संगकारा क्रिकेटच्या निवृत्तीनंतर चक्क शेती करणार आहे. सध्या तो इंग्लीश कौंटी क्रिकेट खेळतोय. कौंटी क्रिकेटचाही त्याचा हा शेवटचा सिझन आहे. सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यानं शेतीमध्ये आपलं मन रमवायचं ठरवलंय. बहुतेक क्रिकेटपटू हे निवृत्तीनंतर कोच बनतात, मॅनेजर बनतात, निवड समितीमध्ये जातात, समालोचक बनतात मात्र कुमार संगकारा हा सगळ्याला अपवाद ठरलाय.  ‘द अॅनलिस्ट’ या क्रिकेटच्या शो मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान संगकाराने आपण शेती करणार असल्याचं सांगितलंय.  श्रीलंकेत निवृत्तीनंतर उदरनिरवाहाकरता शेती करण्याची परंपराच आहे. त्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला नेहमीचं धकाधकीचं जीवन सोडून दूर शेतात जाऊन शेतीची सगळी काम करायला खूप आवडेल असं तो म्हणतो. त्यामुळे येत्या काही वर्षात चहाच्या मळ्यात काम करताना संगकारा आपल्याला पहायला मिळेल. खरंतर संगकाराची भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळे त्याला समालोचकाची ऑफरही आली होती. त्यासाठी त्याला मोठे पैसेही मिळत होते. मात्र त्याने ते सर्व नाकारून शेती करण्याचा निर्णय घेतलाय. क्रिकेटची मैदाने गाजवून जगातल्या अव्वल क्रिकेटपटू म्हणून नाव कमावलेला संगकारा शेतीमध्येही अशीच भरारी घेईल यात शंका नाही. आजकाल आपल्याकडे बहुतेक तरुण हे शेतीपासून दूर जात असताना संगकाराचे हे उदाहरण तरुणांना शेतकीकडे निश्चितपणे आकर्षित करेल आणि शेतीलाही ग्लॅमेर येईल अशी आशा करायला हरकत नाही. संगकाराच्या पुढच्या इनिंगला शुभेच्छा….

COMMENTS