जाणून घ्या, कोण आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद

जाणून घ्या, कोण आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा आज (सोमवार) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. तसेच त्यांचे समाजसेवेतले योगदान खूप मोठे आहे त्याचमुळे राष्ट्रपतीपदासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे आणि त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे.

रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी झाला होता. त्यांना कानपूर विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबीपर्यंतच शिक्षण पूर्ण केल आहे.

दिल्लीच्या हायकोर्टात 1977 ते 1979 मध्ये त्यांनी वकिल म्हणून काम केलं होते. 1994 मध्ये कोविंद उत्तर प्रदेश राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. ते 12 वर्षे पर्यत राज्यसभेचे खासदार होते. कोविंद हे अनेक संसदीय समितीचे सदस्य राहिले होते. 8 ऑगस्ट 2015  रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कोविंद हे भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय कोळी समाजाचेही अध्यक्ष राहिले आहेत.

 

COMMENTS