नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने तीन टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील वांद्र -वरळी, सी लिंक, वाशी आणि मुंबई -पुणे एक्सप्रेस वे या टोलनाक्यांचा समावेश आहे. या टोलनाक्यावर पुढील 29 वर्षे टोलवसुली सुरूचा राहणार आहे.
वांद्र – वर्सोवा, सी लिंकच्या कामासाठी, वांद्र- वरळी सी लिंकचा टोल 2068 पर्यंतच खुला राहणार आहे. खाडीवरील पुलाच्या रूंदीकरणासाठी वाशी टोलनाक्यावर 2038 पर्यंत तर लोणावळा – खंडाळा भुयारी मार्गाच्या कामासाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोल वसुली 2045 पर्यंत सुरू राहणार आहे. पायाभूत सुविधांसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने एमएसआरडीला अतिरिक्त टोल वसुलीची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत.
COMMENTS