राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई-  राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची ‘मातोश्री’वर आज बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.  रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.

रामनाथ कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देऊन शिवसेनेने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मोहन भागवत हे आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते आणि भागवत राष्ट्रपती व्हावेत, असे अजूनही आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही या भूमिकेवरुन यूटर्न घेतला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS