आज जागतिक योग दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनऊमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. राज्यपाल नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. यावेळी मोदींनी उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांसोबत योगाभ्यास केला.
मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, की जगात ज्यांना भारताच्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती नाही ते पण आज योगाचा स्वीकार करत आहेत. योग हे आत्मा, शरीर व मनाचे मिलन आहे. ज्याप्रकारे मीठ जेवणात कमी असले तरी त्याचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होते. तसेच योग न केल्याने त्याचा आपल्या जीवनात परिणाम होतो. योगा शिवाय निरोगी जीवन जगता येत नाही, असेही ते म्हणाले.
I am happy to see so many Yoga institutes being opened over the last three years. Demand for Yoga teachers is increasing: PM Modi pic.twitter.com/dlyQuvmeaz
— ANI UP (@ANINewsUP) June 21, 2017
COMMENTS