केंद्र सरकार पोस्ट कार्यालयात पासपोर्ट देण्याची सुविधा सुरू केल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात आधार कार्डातील चुका दुरूस्तीची सुविधा लवकरच सुरू करणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे.
पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह चार केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. यासोबतच आता ग्रामीण भागात पोहोचलेला टपाल विभाग डिजिटल करून त्या माध्यमातूनही जनतेला सोयी-सुविधा देण्याबाबत वाटचाल सुरू झाली आहे.
आधार कार्ड अपडेटसाठी लागणार 25 रुपये
आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना जुन्या आधार कार्डात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई- मेल आयडी अशी माहिती नव्याने “अपडेट’ करता येणार आहे. ही माहिती अपडेट करण्यासाठी 25 रुपये आकारण्यात येणार आहेत.
COMMENTS