कर्जमाफी संदर्भात राज्यपालांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

कर्जमाफी संदर्भात राज्यपालांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

फडणवीस सरकारने शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत, दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केले आहे. या संर्दभात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव  यांची भेट घेऊन शेतकर्यांना कर्जमाफी बाबत माहिती दिली. 

कर्जमाफीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आज राजभवन येथे घेतलेल्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत माहिती दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत किती आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार, त्यासाठी किती निधी लागणार व त्यासाठीची तरतूद कशी करणार, आदींची माहिती दिली. या योजनेच्या अनुषंगाने राज्यपालांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.

 

COMMENTS