पुणे – भूमाता ब्रिगेड संघटनेचा अध्यक्षा तृप्ती देसाई आणि त्यांच्या पती प्रशांत देसाई विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली आहे.
हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात ऍट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 27 जून रोजी बालेवाडी सर्व्हिस रोडवर तृप्ती देसाई आणि तिच्या काही कार्यकर्त्यांसोबत विजय मकासरे यांच्याशी वाद झाला होता. त्यातून आज हिंजवडी पोलीस ठाण्यात मकासरे यांच्या तक्रारीवरून तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS