पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आमदार संजय कदम यांच्यावर 10 कोटींचा मानहानीचा दावा ठेकला आहे. आ. संजय कदम यांनी योगिता दंत महाविद्यालयाच्या जागे विषयी रामदास कदम यांची मानहानी केल्याप्रकरणी दहा कोटींचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
या प्रकरणी रामदास कदम म्हणाले की, “1 मे ला आत्माराम भुवड यांनी उपोषण केले होते. त्याला आमदार संजय कदम यांनी जाहिर पाठिंबा दिला होता. यावेळी माझी वृतपत्रातून तसेच टीव्हीवरून संपूर्ण देशात बातम्या देऊन बदनामी करण्यात आली.” डेंटल कॉलजची जागा खरेदी रीतसर करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
डेंटल कॉलेजची जागा मी 2005 मध्ये घेतली व 2007 मध्ये बांधकाम सुरू केले. ते काम 2012 मध्ये पूर्ण झाले. आणि 2013 मध्ये आत्माराम भुवड यांनी तक्रार केली. सदरचा दावा खेडच्या न्यायालायत अजूनही प्रलंबित आहे. हा दाव्याचा निकल लागलेला नसताना भुवड तसेच आमदार संजय कदम यांनी उपोषण करून राजकीय आंदोलन केले. याविरुद्ध देखील खेडच्या न्यायालयात 13 जुलैला दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असल्याचे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयानेही 10 कोटींचा दावा दाखल करून घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
COMMENTS