टॉमॅटो आणि बंदूकधारी – काही अर्थ लागतोय, नाही ना !  मग वाचा ही बातमी

टॉमॅटो आणि बंदूकधारी – काही अर्थ लागतोय, नाही ना !  मग वाचा ही बातमी

इंदोर – बंदूकधारी सुरक्षा रक्षक आपण साधारणपणे बँक, एटीएम, किंवा सराफ दुकान याच्यासमोर आजपर्य़ंत पहायलेले आहेत. असं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही कधीही बंदूकधारी सुरक्षा रक्षक पहायला नाही. गोंधळून गेलात ना ! आम्ही तुमची उत्सुकता फार ताणणार नाहीत… अहो सध्या टोमॅटोचे दर कसे गगनाला भिडले आहेत हे तुम्हाला चांगलच माहित आहे. ग्राहकाच्या खिशाला थोडाफार फटका बसतोय. मात्र आमचा टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव मात्र खुशीत आहे. सांगण्याचा उद्देश एकच की सध्या टोमॅटोने किलोमागे शंभरी पार केली आहे. त्यामुळेच त्याला अगदी सोन्याचा भाव आलाय. त्यामुळे त्याचं संरक्षण करणं हे क्रमप्राप्त आहेच. इंदोरच्या एका व्यापा-यानं मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी केला. आता त्याचं संरक्षण कसं करायंचं. तर त्यानं त्यासाठी चक्क बंदुकधारी सुरक्षारक्षक नेमला आहे. देशातल्या काही बाजारातून टोमॅटो चोरीला गेल्यामुळे या व्यापा-यानं सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे.

COMMENTS