कर्जमाफीच्या नावाने ठणाणा, जाहिरातींवर लाखोंचा चुराडा, देवेंद्रा, अजब तुझे सरकार !

कर्जमाफीच्या नावाने ठणाणा, जाहिरातींवर लाखोंचा चुराडा, देवेंद्रा, अजब तुझे सरकार !

मुंबई – राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतक-यांसाठी कर्जमाफीची योजना घोषित केली. त्यात पेरणीसाठी म्हणून तातडीची 10 हजार रुपयांची मदत शेतक-यांना देण्यात येईल अशीही घोषणा केली. मात्र 24 जुनला कर्जमाफीची घोषणा होऊन आजही अनेक शेतक-यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत मिळालेली नाही. कर्जमाफीतर लांबची गोष्ट आहे असंच म्हणावं लागेल. निकषांसह, तत्वतः अशा शब्दछेलात सरकारचे मंत्री गुरफटलेले आहेत. कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सगळीच गोंधळाची स्थिती आहे. असं असताना सरकारने जाहिरातींवर खर्च करण्यास मात्र अजिबात हात आकडता घेतलेला नाही. कर्जमफीच्या घोषणेनंतर त्याची अंमलबावणी रेंगाळली असताना जाहिरात देण्यात मात्र सरकारनं चांगलीच तत्परता दाखवली आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या दोनच दिवसानंतर तब्बल 51 वृत्तपत्रांमध्ये सरकारने जाहिरात दिली आहेत. त्यासाठी 36 लाख 31 हजार रुपये मोजले आहेत. या फक्त वृत्तपत्रांमधील जाहीराती आहेत. यामध्ये टीव्हीवरील जाहिरातींचा समावेश नाही. टीव्हीवरील जाहिरात खर्चाचा यामध्ये समावेश केला तर नक्कीच कोटीची कोटी उड्डाणे घेतली असतील हे नक्की….. म्हणून या सरकारवर जाहीरातींवर चाललेले सरकार अशी जी टीका होते त्यात तथ्य आहे की काय असं वाटायला कर्जमाफी प्रकरणामुळे बळकटी येत आहे.

COMMENTS