मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक वादात आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली असल्याचं दिसून येत आहे. इंधन दरवाढीवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ”पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधला वाद पुन्हा वाढला असल्याचं दिसून येत आहे.
पोलघर पोटनिडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप सादर केली होती. पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना त्यांनी दिल्या होत्या. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध पहावयास मिळालं. त्यानंतर आता या युद्धात आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली असल्याचं दिसून येत असून ”पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
COMMENTS