लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट 18 करा, आदित्य ठाकरे यांची मागणी

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट 18 करा, आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबई – लोकसभा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सध्या 25 वर्ष वयाची अट आहे. ती कमी करुन 18 किंवा 21 वर्ष करावी अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ट्विटरवर त्यांनी ही मागणी केली आहे. जर मतदानाचा हक्क 18 व्या वर्षी मिळत असेल तर निवडणूक लढवण्यासाठी 18  किंवा 21 वर्षाची अट का नसावी असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला  आहे. अनेक देशांमध्ये निवडणूक लढवण्याची अट 18 वर्ष आहे. मग आपल्या देशात का असू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.  आपल्या देशातील तरुण प्रगल्भ आणि उत्साही आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी 18 चे वय केले तर तो अधिक चांगले काम करु शकेल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदानाचे वय 18 वर्ष केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या राजकारणावर झाला. आता आदित्य ठाकरे यांनी मांडलेली ही सूचनाही अशा प्रकारे घ्यायला हवी. मतदानासाठी  जर 18 वर्षांचा तरुण योग्य असले तर निवडणूक लढवण्यासाठी का नाही हा आदित्य यांचा सवालही विचार करायला लावणार आहे. त्यामुळे सरकार, यासंदर्भातील विविध संस्था, अभ्यासक यांनी या सूचनेचा विचार करायला हवा. तुम्हालाही या विषयावर तुमची मते मांडायची असल्यास तुम्ही आम्हाला [email protected]  या मेल आयडीवर मेल करा. काही चांगली मते आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रकाशीत करु.

COMMENTS