मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का बसला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. अहमदनगरमधील सभेत 12 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांच्या प्रवेशानंतर आता हे दोन्ही पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. गेली काही दिवसांपासून हे दोन्ही नेते आपल्या पक्षांवर नाराज होते. प्रचार सभांपासूनही ते दोन हात लांब असल्याते दिसून आले. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते भाजपमध्ये जातील असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज आता खरा ठरत असून हे दोन्ही नेते आता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS