मुंबई – आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार आहे. याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जानेवारी रोजी आम आदमी पार्टीचा बुलढाण्यातील सिंदखेड येथे मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यादरम्यान आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात पक्ष वाढीची जबाबदारी शिवराज्य पक्षाचे नेते तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती सुधीर सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्रातही नव्या जोमात पक्षाची ताकद वाढवली जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात वेगळी फळी निर्माण केली जाणार असल्याचंही सुधीर सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात कितपत यश मिळणार हे भविष्यकाळातच समजणार आहे.
COMMENTS