कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे आम आदमी पार्टीमध्ये नवीन वादळ उठलं आहे. कुमार विश्वास यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे पक्षात एकच खळबळ माजली आहे. पक्ष सोडून गेलेले पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासह इतर नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केलं आहे.
विविध कारणांमुळे किंवा मतभेदामुळे पक्षाच्या संस्थापक सदस्यांसह अनेकांनी पक्ष सोडला आहे. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अंजली दमानिया, मयांक गांधी, धर्मविर गांधी, सुभाष वारे यासारख्या अनेक चांगल्या नेत्यांनी काही ना काही कारणामुळे पक्षाचं काम करायचं थांबवलं आहे. यापैकी कांहीनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे. तर काहीजण पक्ष स्थापन न करता किंवा कुठल्याही पक्षात न जाता सामाजिक काम करत आहे. जे कुठल्याही पक्षात गेले नाहीत त्यांना पक्षात पुन्हा सक्रीय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही कुमार विश्वास यांनी सांगितलं. तर दुसरा पक्ष स्थापन केलेल्या नेत्यांनी त्यांचा पक्ष आम आदमी पार्टीमध्ये विलिन करावा अशीही विनंती त्यांनी केली आहे.
कुमार विश्वास हे गेले काही दिवस पक्षात नाराज आहे. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाले आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोलंल जातंय. वेगळ गट तयार करण्याचा आणि इतर नेत्यांना सोबत घेऊन अरविंद केजरीवाल यांना शह देण्याचा कुमार विश्वास यांचा प्रय़त्न असल्याचं बोललं जातंय. केजरीवाल यांच्या समर्थकांनी मात्र विश्वास याचं वक्तव्य फेटाळून लावलं आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टी कोणत्या दिशेनं जाते ते पहावं लागेल.
COMMENTS