नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसला असून आपचे नेते आशीष खेतान यांनी राजीनामा दिला आहे. आशीष खेतान यांनी २०१४ मध्ये पक्षाकडून लोकसभेची निवडणुक लढवली होती. परंतु अनेक दिवसांपासून ते पक्षाच्या कामकाजात सहभागी होत नव्हते. परंतु खेतान यांनी राजीनामा का दिला याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
I am completely focussed on my legal practice and not involved in active politics at the moment. Rest is all extrapolation. https://t.co/uAPQh8Nba3
— Ashish Khetan (@AashishKhetan) August 22, 2018
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पक्षाचे नेते आशुतोष यांनी राजीनामा दिला आहे. त्याचं दिवशी आशीष यांनी देखील राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तसचे सक्रीय राजकारणात मी सहभागी नाहीये, आता माझं संपूर्ण लक्ष हे वकिली क्षेत्राकडे आहे, अशी माहिती स्वतः खेतान यांनी ट्विटरद्वारे दिली असून याबाबत आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
COMMENTS