पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. सरकारला साडेतीन वर्ष झाली तरी मुख्यमंत्री प्रत्येक बाबतीत अभ्यास सुरू असल्याचं सांगतात. साडेतीन वर्ष झाली तरी या विद्यार्थ्याचा अभ्यासच सुरू आहे. पुढच्या वर्गात ढकलला जात नाही. त्यामुळे या ढ विद्यार्थ्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.
या टीकेला भाजपमधून कोणी उत्तर देण्याच्या आधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावली तर त्यांना पहिला पाठ हा जलसंधारणाचा घ्यावा लागेल अशी उपाहासात्मक टीका आठवले यांनी केली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनीही काही चांगली कामे केली आहेत. मात्र तेवढची कामे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडून शिकावीत. जलसंधारणासारखी कामे शिकू नयेत असंही आठवले म्हणाले. पुण्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
COMMENTS