आशिकी चित्रपटाचा नायक राहुल रॉय याने आज दिल्ली येथील कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया राहुल रॉय यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी भारतीय पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय गोयल उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहेत. त्यांनी भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोण बदलला आहे, हे उल्लेखनिय आहे, असे रॉय म्हटला.
माध्यमांपुढे राहुल रॉयने आशिकी चित्रपटातले लोकप्रिय ‘सासों कि जरूरत है जैसे’ हे गीत गायले. महेश भट्ट यांच्या १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी चित्रपटातून राहुल रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अनु अग्रवाल या चित्रपटाची नायिका होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मात्र, चितपटानंतर राहुल रॉय चर्चेत राहिला नाही. आज त्याने थेट राजकीय पक्षात प्रवेश केला.
COMMENTS