मुंबई – विधानसभेच्या जागांवरून युतीमध्ये ठिणगी पडली आहे. याबाबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीत मतभेद नाहीत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.आमच्यात ‘हवा प्रदूषण नाही.ज्या बातम्या आल्या आहेत ते कुणाचे तरी विचार आहेत. सेना -भाजपमध्ये असं काही नाही. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना – भाजपमध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी 144 -144 असा फॉर्म्युला ठरलेला होता. पण, शिवसेना आणि भाजप यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वीच आगामी दोन्ही निवडणुकांसाठी अभेद्य युती केली होती. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 जागा लढवेल, या फॉर्म्युल्याप्रमाणे जागावाटप करण्याच्या अटीवरच युती झाली होती.परंतु चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मित्रपक्षांना दिलेल्या 18 जागा या भाजपच्याच चिन्हावर लढवल्या जाव्या, असा भाजपचा प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या फॉर्म्युल्याप्रमाणे 135 आणि 153 अशा जागा होणार आहेत.चंद्रकांत पाटील यांच्या नव्या दाव्याने युतीत वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु युतीत मतभेद नाहीत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.आमच्यात ‘हवा प्रदूषण नाही.ज्या बातम्या आल्या आहेत ते कुणाचे तरी विचार आहेत. सेना -भाजपमध्ये असं काही नाही. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS