मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाबाबत शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा केसेस खूप नाजूक असतात. सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करताना अशी प्रकरणं आम्ही पाहतो. अक्षयजी, आहेत मी आहे, आम्ही काही बोलण्यापेक्षा एखाद्याच रेप्युटेशन असतं, फॅमिली असतात. जी बोलते तिच्यावर पण काही होऊ शकतं. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करावी आणि सत्य काय असेल ते पुढे येईल. तेव्हाच आम्ही काही बोलू शकू, पावलं उचलू शकू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान मी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणमध्ये केसेस बघतो त्या इतक्या डीप असतात. पुढे ट्रॉमा होऊ शकतो. हे सांभाळून सगळ्या गोष्टी पुढे जाणं गरजेचं आहे. आम्ही बोलून गोंधळ पुढे वाढवण्यापेक्षा अशा प्रकरणात तपास सेन्सिबली व्हावा असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS