मुंबई – ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यानंतर आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी ३ ऑक्टोबर रोजी वरळी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि धाकटा भाऊ तेजसही उपस्थित होता. बुधवारी निवडणुकीच्या सभेसाठी संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही गेले होते. त्यामुळे तेजस ठाकरे हे राजकारणात लवकरच पूर्ण वेळ सक्रिय होती अशी चर्चा आहे.
दरम्यान वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आमदार झाले तर युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी तेजस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही काळापासून तेजस यांचा राजकीय मंचावरील वावर वाढत असल्याचा दिसत आहे. अशातच काल ते निवडणुकीच्या सभेसाठी संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंसोबत गेले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी असल्याची चर्चा आहे.
COMMENTS