मुंबई – शिवसेनेचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ काेटी ३८ लाखांवर आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंवर कुठलंही कर्ज नाही.
आदित्य ठाकरेंची संपत्ती
बँक ठेवी – १० काेटी ३६ लाख
बॉन्ड शेअर्स – २० लाख ३९ हजार
वाहन – BMW कार
Mh -09 Cb -1234
किंमत – ६ लाख ५० हजार
दागिने – ६४ लाख ६५ हजार
इतर – १० लाख २२ हजार
एकूण – ११ काेटी ३८ लाख
स्थावर मालमत्ता – ४ काेटी ६७ लाख आहे
आदित्य ठाकरेंची स्थावर मालमत्ता
कल्याणमधील श्रीजी आर्केडमध्ये शॉप( १२५० चाैफूट )हा आई रश्मी ठाकरेंने आदित्यला आँगस्ट २०१९ मध्ये गिफ्ट दिलाय. किंमत – ८९ लाख ४० हजार
घाेडबंदर शॉप ( १५०८ चाैफूट) किंमत- ३ काेटी
दाेन्ही शॉपची किंमत – ३ काेटी ८९ लाख ४० हजार
खालापूरमध्ये ५ वेगवेगळी सर्व्हेची शेतजमीन असून त्याची किंमत ७७ लाख ६६ हजार आहे.
एकूण स्थावर मालमत्ता- ४ काेटी ६७ लाख
गुंतवणूक – ११ काेटी ३८ लाख
एकूण १६ काेटी ५ लाख ५ हजार २५८ रूपये आहे.
COMMENTS