मुंबई – शिवसेना नेते आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक वरळीतून लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण याबाबतची घोषणा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी वरळीच्या शिवसैनिकांमध्ये केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वरळीच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याची माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणवणार असल्याचे जवळपास निश्चित झालं असल्याचं दिसत आहे. शिवसेना गटप्रमुखांच्या या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते.
यावेळी अनिल परब यांच्या या घोषणेचं विद्यमान आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आदित्य ठाकरे हे उतरणार आहेत. तसेच त्यांना एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून आणणार असल्याचा निर्धार शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
COMMENTS