उपमुख्यमंत्री होणार का?, आदित्य ठाकरे म्हणाले…

उपमुख्यमंत्री होणार का?, आदित्य ठाकरे म्हणाले…

नागपूर – आम्ही पक्ष किंवा सरकार म्हणून नेहमीच शेतकऱ्यांच्यासोबत आहोत. कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारामुळे झाली, मात्र आमचं उद्दिष्ट कर्जमुक्ती आहे. पीकविमा योजनेसाठी आम्ही लढतोय. सरकारने जी कर्जमाफी केली, त्यात अनेक त्रुटी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजे. जिथे सरकार करणार नाही तिथे आम्ही आंदोलन करू असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदाबद्दल विटारले असता, मी हे पेपर सध्या फोडणार नाही. मात्र जी जबाबदारी देईल ती जनता देईल असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

युती बद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली आहे. तेच या बद्दल बोलतील. मी त्यांच्यासमोर खूप लहान आहे.लोकसभा निवडणुकाच्या वेळी जी प्रेस कॉन्फरेन्स झाली होती, त्यात सर्व स्पष्ट होते. त्यापुढे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युतीबद्दल चर्चा होत आहे. मी बोलणे योग्य नाही. ही युती मुद्द्यांसाठी आहे. सत्तेसाठी नाही. आमच्यासमोर कर्जमुक्ती, विकास, राम मंदिर असे अनेक मुद्दे आहेत. ते आम्हाला साध्य करायचे आहेत.

COMMENTS